श्री ऋणमोचन महागणपतिस्तोत्रम
- जय जगदंब
- May 8
- 4 min read
महागणपती हे श्रीगणेशाचे एक उग्र, तेजस्वी आणि अत्यंत प्रभावशाली रूप आहे. सामान्यतः आपण श्रीगणेशाला विघ्नहर्ता, सुखकर्ता, बुद्धीदेवता आणि प्रथमपूज्य म्हणून ओळखतो, परंतु महागणपती हे त्यांचे एक तांत्रिक व अतीगुप्त रूप आहे, जे विशेषत: देवी उपासकांच्या रक्षणासाठी, इच्छापूर्ती आणि वाकसिद्धीसाठी पूजले जाते. महागणपती हे महाविघ्नहर्ता असून त्यांच्या स्तोत्र, कवच आणि उपासनेचे देवी उपासकांनमध्ये विशेष महत्त्व आहे. देवीच्या प्रत्येक स्वरूपाच्या उच्च उपासनेमध्ये महागणपतीच्या उपासनेचा खूप महत्त्वाचा भाग आहे.
महागणपतीचे हे रूप केवळ पूजनासाठी नसून आत्मिक उन्नती, सिद्धी प्राप्ती, बोलण्यात प्रभाव, राजकीय यश, विद्वत्ता, धनप्राप्ती, कर्जमुक्ती, शत्रूनाश आणि वाक्सिद्धीसाठी उपयुक्त मानले जाते. हे गणपतीचे रूप उग्र असून त्यांची उपासना नियमबद्ध आणि श्रद्धायुक्त असली पाहिजे. देवी उपासक जर महागणपतीच्या स्तोत्राचा 2100 वेळा पाठ 21 दिवसांच्या कालावधीत करत असेल, तर त्याला विशेष फल प्राप्त होते. ही उपासना घरच्या घरीही केली जाऊ शकते, परंतु त्यात नित्य नियम, सात्त्विकता, स्तोत्रोच्चार शुद्धता आणि मनाची स्थिरता आवश्यक असते.
या उपासनेच्या प्रारंभी श्रीगणेशाचा संकल्प करून, पवित्र स्थळी, शक्यतो उत्तर किंवा पूर्वमुखी बसून, महागणपतीचे स्तोत्र पाठ सुरू करावा. पहिल्या दिवशी संकल्प करूनच स्तोत्रपठणाला प्रारंभ करावा. 21 दिवस नित्य नियमाने 100 ते 108 वेळा पाठ केल्यास 2100 स्तोत्रपठण पूर्ण होतो. या काळात विशेष आहार संयम, मौन, सात्त्विकता आणि एकाग्रता पाळावी. या स्तोत्रपठणाचे एक वैशिष्ट्य म्हणजे, 6 महिन्यांपर्यंत जर देवी उपासक ही उपासना सातत्याने करतो, तर त्याला जीवनात प्रत्यक्ष फळ मिळायला लागते. मग ते आर्थिक संकटातून बाहेर पडणे असो, मानसिक स्थैर्य असो, किंवा समाजात मान-सन्मान प्राप्त होणे असो, महागणपतीची कृपा देवी उपासकावर दिसून येते. अनेक देवी उपासकांचे अनुभव आहेत की, त्यांनी 6 महिन्यांच्या उपासनेनंतर त्यांचे कठीण प्रश्न सोपे झाले, कोर्ट-कचेर्या थांबल्या, विरोधक शांत झाले आणि जीवनात समृद्धी आली.
एक वर्ष सातत्याने म्हणजे दररोज न चुकता स्तोत्रपठण केल्यास, देवी उपासकाला वाक्सिद्धी प्राप्त होते असे मानले जाते. वाक्सिद्धी म्हणजे बोललेले सत्य होणे. अशा देवी उपासकाची वाणी प्रभावशाली होते, त्याचा आदेश लोक पाळतात, आणि त्याच्या विचारांना समाजात वजन प्राप्त होते. ही सिद्धी मिळवणे हे अत्यंत दुर्लभ असून त्यासाठी पूर्ण संयम, गुरूच्या मार्गदर्शनाखाली उपासना, सात्त्विक जीवनशैली आणि कठोर नियम आवश्यक असतात. वाक्सिद्धी मिळाल्यावर देवी उपासकाचा आत्मविश्वास प्रचंड वाढतो आणि तो समाजासाठी सकारात्मक कार्य करू शकतो. महागणपती स्तोत्रपठणाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हे रूप यंत्र, तांत्रिक प्रयोग मध्येही प्रभाव दाखवते. महागणपती स्तोत्र 11 वेळा रोज नित्य नियमाने घरात म्हटल्यास धनप्रवाह सुरु होतो, शत्रु नष्ट होतात आणि वाईट दृष्टि, नजर, तांत्रिक अडथळे यापासून संरक्षण मिळते. ही उपासना करताना महागणपतीच्या 8 किंवा 12 हात असलेल्या मूर्तीचा किंवा चित्राचा उपयोग करावा. त्यांच्या हातात असणारे आयुधे म्हणजेच गदा, पाश, अंकुश, त्रिशूळ, जपमाळ, शंख इत्यादी आपल्याला त्यांच्या शक्तीचे द्योतक वाटते.
महागणपतीची उपासना करताना आंतरिक शुद्धता, मनाची एकाग्रता, आणि संपूर्ण श्रद्धा यांचे पालन अनिवार्य असते. महागणपती आणि गणेशाच्या इतर सर्व उग्र रूपांच्या उपासना करण्याचा अधिकार केवळ विधीवत गुरुदीक्षा, गुरूची अनुमति आणि पात्र असलेल्या देवी उपासकांनाच आहे. उपासनेच्या काळात काही विशिष्ट नियम पाळले गेले पाहिजेत जसे की - मांसाहार, मद्य, खोटे बोलणे, अहंकार, अतिखाणे आणि अतिविलास यापासून दूर राहणे. सकाळी सूर्योदयाच्या पूर्वी उठून स्नान करून पूजनाला बसणे सर्वात श्रेयस्कर मानले जाते. गणपतीला पिवळ्या फुलांचा हार, दूर्वा, लाडू व हळद-कुंकवाचा नैवेद्य अर्पण करणे आवश्यक असते. त्यानंतर स्तोत्रपाठ केले जाते.
महागणपती स्तोत्रात अनेक विशेष नामावलीद्वारे त्यांच्या स्वरूपाचे वर्णन केले जाते. या स्तोत्रात त्यांच्या उग्र स्वरूपांचा समावेश असून ते सर्व विघ्न नष्ट करणारे, सुखदायक आणि देवी उपासकाचे रक्षण करणारे आहेत. या स्तोत्राचा उच्चार जितका स्पष्ट व नादमय असेल, तितका त्याचा प्रभाव अधिक असेल. महागणपतीसाठी केवळ पाठांतर असून चालत नाही, तर देवी उपासकाच्या गुरुची अनुमति आणि महागणपतीवर पूर्ण विश्वास, श्रद्धा आणि नित्य प्रार्थना आवश्यक आहे. त्यांची उपासना केल्याने मनाची शांती मिळते, निर्णयक्षमता वाढते, आणि आयुष्यातील अडथळे दूर होतात. काही देवी उपासक त्यांच्या स्वप्नात महागणपतीचे दर्शन घेतात, ज्यामध्ये त्यांना मार्गदर्शन, उपाय, किंवा आशीर्वाद मिळतो. ही एक आध्यात्मिक अनुभूती असते आणि उपासनेचा एक उच्च टप्पा मानला जातो.
WhatsApp Group : https://chat.whatsapp.com/H3qxKhDzrGG6JfLVcp0GcN
महागणपती उपासना ही एक गुप्त, प्रभावी आणि दिव्य उपासना आहे. ती केवळ कर्जमुक्तीसाठी किंवा यशासाठी नसून आत्मिक प्रगती, अध्यात्मिक उन्नती आणि लोककल्याणासाठी देखील वापरता येते. श्रीगणेश हे केवळ बालस्वरूपातील गोंडस देवता नाहीत, तर ते उग्र रूपातही सर्व विघ्नांचा नाश करणारे, देवी उपासकाला उन्नत करणारे आणि जडतेतून मुक्त करणारे आहेत, हे महागणपतीच्या उपासनेतून प्रकर्षाने लक्षात येते.
जर ही उपासना योग्य गुरूंच्या मार्गदर्शनाखाली, नियमित पद्धतीने आणि पवित्र भावनेने केली गेली, तर देवी उपासकाच्या जीवनात चमत्कारीक बदल घडतात. म्हणूनच, महागणपती उपासना ही कर्म आणि वाणीने विश्वात बदल घडवण्याची एक संधी आहे.
ही उपासना सुरू करण्याआधी गुरूचे मार्गदर्शन, यथाशक्य तप आणि शुद्धता यांचे पालन करणे आवश्यक आहे. या विषयी गूढ माहिती, मार्गदर्शन किंवा महागणपती स्तोत्राच्या शुद्ध स्वरूपासाठी www.gurumaai.org या संकेतस्थळाला अवश्य भेट द्या.
श्री महागणपतीची कृपा सर्व देवी उपासकांवर सदैव राहो हीच जगदंबे चरणी प्रार्थना.

श्रीऋणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
अस्य श्रीऋणमोचनमहागणपतिस्तोत्रस्य शुक्राचार्य ऋषिः, अनुष्टुप्छन्दः, श्रीऋणमोचक महागणपतिर्देवता ।
मम ऋणमोचनमहागणपतिप्रसादसिद्ध्यर्थे जपे विनियोगः ॥
रक्ताङ्गं रक्तवस्त्रं सितकुसुमगणैः पूजितं रक्तगन्धैः क्षीराब्धौ रत्नपीठे सुरतरुविमले रत्नसिंहासनस्थम् ।
दोर्भिः पाशाङ्कुशेष्टाभयधरमतुलं चन्द्रमौलिं त्रिणेत्रं ध्यायेत् शान्त्यर्थमीशं गणपतिममलं श्रीसमेतं प्रसन्नम् ॥
स्मरामि देव देवेशं वक्रतुण्डं महाबलम् । षडक्षरं कृपासिन्धुं नमामि ऋणमुक्तये ॥ १॥
एकाक्षरं ह्येकदन्तमेकं ब्रह्म सनातनम् । एकमेवाद्वितीयं च नमामि ऋणमुक्तये ॥ २॥
महागणपतिं देवं महासत्वं महाबलम् । महाविघ्नहरं शम्भोः नमामि ऋणमुक्तये ॥ ३॥
कृष्णाम्बरं कृष्णवर्णं कृष्णगन्धानुलेपनम् । कृष्णसर्पोपवीतं च नमामि ऋणमुक्तये ॥ ४॥
रक्ताम्बरं रक्तवर्णं रक्तगन्धानुलेपनम् । रक्तपुष्पप्रियं देवं नमामि ऋणमुक्तये ॥ ५॥
पीताम्बरं पीतवर्णं पीतगन्धानुलेपनम् । पीतपुष्पप्रियं देवं नमामि ऋणमुक्तये ॥ ६॥
धूम्राम्बरं धूम्रवर्णं धूम्रगन्धानुलेपनम् । होम धूमप्रियं देवं नमामि ऋणमुक्तये ॥ ७॥
भालनेत्रं भालचन्द्रं पाशाङ्कुशधरं विभुम् । चामरालङ्कृतं देवं नमामि ऋणमुक्तये ॥ ८॥
इदं त्वृणहरं स्तोत्रं सन्ध्यायां यः पठेन्नरः । षण्मासाभ्यन्तरेणैव ऋणमुक्तो भविष्यति ॥ ९॥
इति श्रीब्रह्माण्डपुराणे श्रीऋणमोचनमहागणपतिस्तोत्रं सम्पूर्णम् ।
Comments