top of page

वैयक्तिक मार्गदर्शन

वैयक्तिक मार्गदर्शनासाठी सूचना

वैयक्तिक मार्गदर्शन

१. संपर्क वेळ आणि प्रक्रिया समजून घ्या

  • सकाळी ८ वाजता ते रात्री ८ वाजेपर्यंत याच वेळेतच संपर्क साधावा.

  • 7028177950 या अधिकृत क्रमांकावर फोन करा.

  • फोन उचलणाऱ्या व्यक्तीस (जसे की रश्मी ताई) अपॉईंटमेंट घेण्याची संपूर्ण प्रोसेस नीट विचारून समजून घ्या.


२. माई स्वतः फोन उचलत नाहीत

  • माईंशी बोलण्यासाठी फक्त अपॉईंटमेंटद्वारेच संवाद शक्य आहे.

  • कोणताही थेट किंवा अचानक कॉल माई उचलत नाहीत.

  • अपॉईंटमेंटची वेळ आणि पद्धत ही कार्यालयीन व्यवस्थापनातून ठरवली जाते.


३. अपॉईंटमेंटसाठी देणगी स्वरूपात शुल्क आवश्यक आहे

  • वैयक्तिक मार्गदर्शनासाठी एक ठराविक देणगी शुल्क संस्थेने निश्चित केले आहे.

  • हे शुल्क माई स्वतःसाठी वापरत नाहीत.ते पूर्णपणे संस्थेच्या गौशाळा, अन्नदान, शिक्षण, सेवा, आध्यात्मिक कार्यक्रम यामध्ये वापरले जाते.

  • पावती हवी असल्यास आधीच मागावी. संस्थेची अधिकृत पावती 80G अंतर्गत दिली जाऊ शकते.


४. एका अपॉईंटमेंटमध्ये किती व्यक्तींसाठी मार्गदर्शन मिळते?

  • एका अपॉईंटमेंटमध्ये कमाल दोन व्यक्तींविषयी मार्गदर्शन घेतले जाऊ शकते.उदा. – पती-पत्नी, आई-मुलगा, सासू-सून, भाऊ-बहीण इ.

  • जर तुम्हाला तिसऱ्या किंवा त्याहून अधिक व्यक्तींविषयी मार्गदर्शन हवे असेल, तर त्यांच्या नावाने अतिरिक्त शुल्क आधीच भरावे लागेल. वैयक्तिक मार्गदर्शन


५. बोलण्याची वेळ आणि पद्धत

  • माईंशी बोलताना ठराविक मिनिटांची कोणतीही मर्यादा नसते.

  • तुम्ही विचारलेले सर्व प्रश्न, समस्या, शंका यावर समाधान होईपर्यंत माईंशी सविस्तर संवाद साधता येतो.

  • मात्र, गैरवाजवी वेळ घेणे टाळावे – कारण इतर लोकांनाही वेळ देण्यात येतो.


६. माईंशी बोलण्यापूर्वीची तयारी

  • एक शांत जागा निवडा – जिथे गोंगाट, टी.व्ही., फोन कॉल्स, बाहेरचा आवाज किंवा व्यत्यय नसेल.

  • वही व पेन जवळ ठेवा – जेणेकरून माईंनी सांगितलेले उपाय, सूचना, मंत्र, महत्त्वाचे मुद्दे लगेच लिहून घेता येतील.

  • जे समजले नाही, ते तत्काळ विचारून घ्या.नंतर "समजलं नाही, परत सांगा" असं सांगणे शक्य नसते – कारण नंतर माईंशी बोलण्याची पुनः संधी लगेच मिळत नाही.


७. माईंशी बोलताना आदरपूर्वक आणि सजगपणे वागा

  • माई तुमच्याशी अत्यंत प्रेमळ, आपुलकीने बोलतात.

  • त्या आईसारख्या मायेने संवाद साधतात, पण त्या कोण आहेत याचं भान ठेवून संवाद साधावा.

  • संपूर्ण आदर, श्रद्धा आणि नम्रता बाळगून संवाद करा.

  • माईंशी बोलताना ही वेळ साधा फोन कॉल नसून, एक आध्यात्मिक संवाद आहे याची जाणीव ठेवा.


८. नंतरच्या अडचणी टाळण्यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा

  • तुम्ही लिहून घेतलं नाही किंवा नीट समजून घेतलं नाही म्हणून पुन्हा संपर्क साधून “माईंनी काय सांगितलं होतं?” असं विचारलं, तर उत्तर मिळेलच याची खात्री देता येत नाही.

  • कारण दररोज अनेक लोक माईंशी मार्गदर्शनासाठी अपॉईंटमेंट घेतात.

  • त्यामुळे, पहिल्याच संवादात तुम्ही पूर्ण लक्ष देऊन ऐका, लिहा आणि समजून घ्या.


९. अपॉईंटमेंटसाठी पैसे भरताना...

  • देणगी संस्थेच्या नावाने पाठवली जाते.

  • तुम्ही ते Google Pay / UPI / Account Transfer ने करू शकता (याची माहिती फोनवर दिली जाईल).

  • पावती हवी असल्यास, कृपया ती आधीच मागावी.


१०. आपण तयार असताना अपॉईंटमेंट ठरवली जाईल

  • एकदा प्रक्रिया पूर्ण झाली की, तुम्हाला तुमच्या सोयीच्या वेळेनुसार उपलब्ध वेळ दिली जाईल.

  • माईंशी फोनवर किंवा WhatsApp Call द्वारे संवाद होतो.

Comments


bottom of page