गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम 2025
- जय जगदंब
- Jul 7
- 2 min read
गुरु म्हणजे केवळ एक व्यक्ती नसतात. गुरु म्हणजे आपले जीवनच उजळवणारी एक दिव्यता, एक प्रेरणा, एक दिशा. ते आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे घेऊन जातात. आपल्यातील सुप्त शक्तींना जागं करतात. जीवनात जिथे कुठे आपण अडकतो, तिथे गुरु एक प्रकाशस्तंभासारखे उभे राहतात आणि आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. त्यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजेच गुरुपौर्णिमा.
या दिवशी संपूर्ण महाशक्तिपीठात एक वेगळीच ऊर्जा अनुभवायला मिळते. भक्ती, समर्पण, आणि कृतज्ञतेच्या भावनांनी परिपूर्ण असा दिवस. नेहमीप्रमाणे यंदाची गुरुपौर्णिमा विशेष ठरणार आहे. विविध आध्यात्मिक कार्यक्रम, शिष्यांचे अनुभव, गुरूंचा ज्ञानप्रवाह, मंत्रदीक्षा सत्र आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी ९ वाजता कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. म्हणून ८.३० ला समस्त शिष्यवृंदाने उपस्थित असणे आवश्यक आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असणाऱ्यांनी ९ - ९.१५ पर्यन्त आल्यास चालेल.
दिवसाचा समारोप संध्याकाळी ५ वाजता होईल.
हा संपूर्ण कार्यक्रम "समस्त शिष्यवृंद (महाशक्तीपीठ)" यांच्या वतीने आयोजित केला गेला आहे. कार्यवाहक म्हणून गणेश कोळी, पांडुरंग तांदूळवाडे, किशोर गायकवाड, हर्षवर्धन जाधव आणि समस्त शिष्यवृंद हे पूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि व्यवस्थापन बघत आहेत.
कार्यक्रमाचे ठिकाण म्हणजेच महाशक्तीपीठ कार्यालय, नेरळ-बदलापूर हायवे, जिल्हा ठाणे येथे स्थित आहे.
कार्यक्रमात सहभागी होण्याची इच्छा असल्यास अधिकृत संपर्क क्रमांकावर पूर्वसूचना द्यावी.
संपर्क - 7028177950. गणेश कोळी यांच्याशी 7506775413 किंवा 9172042950 या क्रमांकांवर देखील संपर्क साधू शकता.
विशेष सूचना - ज्यांना गुरुमंत्राची दीक्षा घ्यायची आहे त्यांनी पूर्वसूचना देऊन, रश्मिताईंशी संपर्क साधून सहभागी व्हावे.
या दिवशी मंत्रदीक्षा, शिष्यप्रवेश, आणि महाप्रसाद या कोणत्याही गोष्टीसाठी कोणतीही फी, शुल्क किंवा दक्षिणा घेतली जाणार नाही.
हे संपूर्ण कार्यक्रम निःस्वार्थ प्रेम आणि सेवाभावाने गुरूचरणी अर्पण करण्यात आले आहे.
गुरुपौर्णिमेच्या या दिवशी, महाशक्तीपीठाच्या पवित्र भूमीवर आपल्या अस्तित्वाला एक नवीन दिशा, नवीन ऊर्जा आणि दिव्य स्पर्श मिळावा हीच प्रार्थना.
महाशक्तिपीठाच्या शिष्यवृंदाच्या वतीने तुमच्यासाठी सादर करत आहोत, भाविकतेने भरलेला संपूर्ण गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रम.
आपल्या उपस्थितीने हे आयोजन अधिक मंगलमय होईल. गुरुपौर्णिमेच्या सर्व भक्तांना, भाविकांना, देवी भक्तांना आणि शिष्यांना मनःपूर्वक शुभेच्छा...!

Kommentare