भोंदूने सुशिक्षित बाईला लुबाडले
- जय जगदंब
- Jun 13
- 3 min read
Updated: Jun 15
जय जगदंब जय भवानी 🙏
मी रश्मीताई, तुमच्यापैकी अनेकांना माहीत असलेली.आज मी तुम्हाला माझी या जगदंबेच्या चरणी जोडले जाण्याची कहाणी सांगणार आहे. मी या इथे माईंच्या बरोबर जोडले जाण्याआधी मी अतिशय विचित्र परिस्थितीत फसले होते. माझ्या मुलीचे लग्न लावून दिले होते. पण म्हणतात ना आपले चांगले झालेले लोकांना बघवत नाही. मी एवढी सुशिक्षित असतानाही मला एका भोंदु बाबाने फसवले. त्याने माझे घरातील भांडी, जमीन जुमला माझाकडे असलेला पैसा अडका सगळे फसवून काढून घेतले. आणि दोन बॅग हातात देऊन हाकलून दिले.
आपले सर्वस्व हिरावून घेतलेले असताना माईंची ओळख झाली होती. शेवटी माईंनी तिकीट काढून दिले. आणि स्वतःकडे बोलावून घेतले. स्टेशनवर दादाला पाठवून मला घरी घेऊन आल्या.
खरे तर मी माझेच सांगत आलेय पण माईंनी कोणत्या परिस्थितीत मला आधार दिला ते तर सांगितलेच नाही. स्वतः माईं स्वता अत्यंत साध्या परिस्थिति मध्ये राहतात. अशाही परिस्थितीत त्यांनी एका बेघर झालेल्या स्त्रीला (मला) आधार दिला.

मी घरी गेले तर ," तू दिवसभर काही खाल्ल नसेल, हातपाय धुवून जेवायला बस." असे आईच्या मायेने जेवायला घातले. दोन तीन दिवस मला शांत होऊ दिले पण त्यांनी बघितले की मी नैराश्य आणि माझ्या मुलीच्या आठवणीत दिवसरात्र खणगून जात आहे आणि मनाला खात आहे, मी डिप्रेशन मध्ये जाऊन जीवाचे काही बरे वाईट करू नये म्हणून त्यांनी मला महाशक्तीपिठात येणारे कॉल्सला उत्तर द्यायला सांगितले यामुळे माझे लक्ष माझ्या दुख आणि भूतकाळवरुण वळवले. तेव्हा पासून मी जवळपास सर्वच कॉल मी उचलते.
मी आज 3 वर्षापासून माईंनकडे राहते पण आजवर कधीही त्यांना पैसा जमा करताना बघितले नाही. दक्षिणेत आलेले पैसे सरळ गोसेवेसाठी पाठवून देतात. जेवढे आवश्यक आहे तेवढेच घेतात. न त्यांना पैशाचा लोभ न सोन्याचे दागिने घालून मिरवण्याची हौस. आजच्या भडक कपडे आणि दागिने घालून मिरावणाऱ्या लोकांच्या गर्दीमध्ये मला माझी गुरुमाई साक्षात ब्रह्मचारिणी स्वरूपातील जगदंबा म्हणून भासते. त्यांच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते भडक मेकअप करून फिरणाऱ्यामध्ये येउच शकत नाही. त्यांच्या कित्येक शिष्यांना हायसे वाटते कारण मी माईंच्या सहवासात राहून उपासना शिकले. रोज त्यांच्या सोबतच उपासनेला बसते. आणि कधी कधी त्यांच्या हातचे प्रसादरूपी जेवण सुद्धा मिळतो. अन्नदान करताना सर्रास माईच स्वयंपाक करतात. माईंच्या हातचे जेवण मिळणे म्हणजे साक्षात अन्नपूर्णेची कृपा होणे आहे.
असे माझे आणि महाशक्तीपीठ परिवाराचे एक अजोड असे नाते निर्माण झाले. मला माईंनी फोनवर बोलताना," जय जगदंब" असे म्हणायला सांगितले. त्याप्रमाणे मी तसेच म्हणायला सुरुवात केली आणि जगदंबेच्या नावाचा हा मंत्र माझ्या आयुष्यात एक परिवर्तन देऊन गेला.
अशा या 'जय जगदंब' या मंत्राचे माझ्या आयुष्यात अनन्यसाधारण महत्व आहे. "जगदंब "या मंत्राने माझे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या मंत्राने मला आत्मविश्वास दिला. या मंत्राने मला जगण्याची उमेद दिली, या मंत्राने मला समाजात इज्जत दिली. मला मान मिळाला.मला जगण्याचा नवा मार्ग मिळाला.या मंत्राने माझी आध्यात्मिक उंची वाढली आणि इहलोकीचा मार्गही मोकळा झाला.

महाशक्तीपिठाने 108 कोटी जगदंब नामलेखन आणि शक्तियाग याचे व्रत घेतले आहे. आणि त्यात मी सुद्धा सहभाग घेतला आहे. तुम्ही म्हणाल की आता यात सहभाग घेण्यासाठी किती दक्षिणा लागते? किती फी लागते? तर त्याचे उत्तर एक रुपया पण दक्षिणा किंवा फी लागत नाही.लागते ती फक्त श्रद्धा आणि भक्ती.. या दोन गोष्टी तुमच्याजवळ असतील तर तुम्ही नक्कीच या नामाचा वसा घेऊ शकता. मी रोज जसा मला वेळ मिळेल तसे नामलेखन करत आहे. अत्यंत दिव्य अनुभव मी अनुभवले आहेत. दुसरे म्हणजे नाम लेखनाचा वसा घेतल्याने मनातली भीती नाहीशी झाली. मन शांत आणि स्थिर झाले. मनातल्या वेदना हळूहळू कमी झाल्या. मनाची अस्वस्थता, उलघाल कमी झाली.
आणि महाशक्तीपिठात येणारे जवळपास सर्वच कॉल मी उचलते किंवा कधी कधी कोणी दुसरे महाशक्तीपिठातील उपासक उचलतात. म्हणून माझे सर्व शिष्य परिवार आणि इतरांसोबत बोलणे होतेच. त्यातून मला कळतेच की माझ्यासारखेच नामलेखणचे व्रत घेतलेल्यांना वेगवेगळे अनुभव आले. कोणाचा आर्थिक प्रश्न सुटला. कोणाला कौटुंबिक सुख प्राप्त झाले.
आता हा अनुभव मोठ्या प्रमाणावर घेण्यासाठी मी तुम्हा सर्वांना आवाहन करते की जीवनात अध्यात्माची पायरी चढून अनुभव घेण्याची इच्छा ठेवणाऱ्यांनी हे व्रत घेऊन त्याचा दिव्य अनुभव घ्या आणि आपल्या बरोबर किमान दोघांना तरी याची माहिती द्या जर त्या व्यक्ति च्या नशिबात असेल तर करेल नाही तर जशी जगदंबेची इच्छा! या नामलेखनाच्या व्रत घेऊन आत्मविश्वास आणि जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी तयार व्हा!
जय जगदंब जय भवानी जय शिवराय🙏🙏🙏
लेखिका - रश्मिताई
तुम्हाला पण असे अनुभव पाठवायचे आहेत का?
होय, आणि वाचायला खूप आवडतात.
नाही, पण वाचायला खूप आवडतात.
Comments